भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजगी महाराष्ट्राला परिचीत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यामुळे एकनाथ खडसेंच्या मनातील खदखद अनेकदा मीडियासमोर आली आहे. तर, भूखंड घोटाळ्यात नाव आले. तसेच, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशीही खडसेंचे संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे खडसेंचे मंत्रीपदही काढून घेण्यात आले होते. मात्र, भूखंड घोटाळ्यातून क्लिन चीट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा खडसेंना मंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा होती.
मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना मंत्रीपद देण्यात येणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यावेळीही त्यांना मंत्रीपदाच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यात आले. पण, मीच केवळ 6 महिन्यांच्या मंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचं खडसेंनी म्हटलं होता. त्यानंतर, भुसावळ येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी खडसेंबाबत वेगळेच संकेत दिले आहेत.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19